रामदेव बाबांचे आटा न्यूडल्सही वादाच्या भोवऱ्यात

Updated: Nov 18, 2015, 10:54 AM IST
रामदेव बाबांचे आटा न्यूडल्सही वादाच्या भोवऱ्यात title=

नवी दिल्ली - सुरक्षेच्या कारणावरुन वादग्रस्त ठरलेल्या टू मिनिट मॅगीनंतर आता योगगुरू रामदेव बाबा यांचे पतंजली आटा न्यूडल्सही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दोन दिवसांपूर्वीच रामदेव बाबांनी या न्यूडल्सचे लाँचिंग केले. मात्र बाजारात पाऊल ठेवत नाही तोपर्यंत या न्यूडल्सवरुन नवा वाद सुरु झालाय. 

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पतंजली आटा न्यूडल्सने भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाची (एफएसएसआय) परवानगी घेतलेली नाही. पतंजली न्यूडल्सच्या पाकीटांवर एफएसएसआयचा लायसंस नंबर लिहिलेला आहे. मात्र मान्यतेसाठी एफएसएसआयकडे अद्याप पतंजलीकडून कोणताही प्रस्तावही पाठवला नसल्याचे अहवालात म्हटलंय.

आणखी वाचा - मॅगी विरोधात सरकार २ मिनिटंही बोलणार नाही?

पतंजली आटा न्यूडल्सने एफएसएसआयकडून परवानगी घेतलेली नाही. याबाबतची चौकशी सुरु असल्याची माहिती यावेळी एफएसएसआयचे अध्यक्ष आशिष बहुगुणा यांनी दिली. सोमवारी रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या पौष्टिक न्यूडल्स लाँच केल्या होत्या. इतर न्यूडल्सच्या तुलनेत हे नूडल्स पौष्टिक असल्याचा दावा रामदेव बाबांनी केला होता. तसेच वर्षभरात दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या पाच ठिकाणी उत्पादन कंपनी सुरु करणार असल्याचे सांगितले होते. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.