नवी दिल्ली : उरीतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका आणि रशिया दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याची माहिती घेतली आहे.
यानंतर राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी विशेष आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, आयबी, रॉचे अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत सीआरपीएफचे महासंचालकही उपस्थित आहे.
या बैठकीत उरी दहशतवादी हल्ल्याची समीक्षा करण्यात येतेय. या हल्ल्यानंतर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला असून सर्व विमानतळांची सुरुक्षा वाढवण्यात आली आहे.
Delhi: HM Rajnath Singh chairs high level security meet. NSA, Home Secy,IB Chief present (Inside Visuals) #UriAttack pic.twitter.com/MYUAiqa9ro
— ANI (@ANI_news) 18 September 2016
#WATCH HM Rajnath Singh chairs high level security meet in Delhi. NSA, Home Secy,IB Chief present #UriAttack pic.twitter.com/vjpQPq9QTD
— ANI (@ANI_news) 18 September 2016