श्रीनगर येथे पावसामुळे पूरस्थिती, बारामुल्लात जोरदार बर्फवृष्टी

श्रीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर दुसरीकडे बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 6, 2017, 05:58 PM IST
श्रीनगर येथे पावसामुळे पूरस्थिती, बारामुल्लात जोरदार बर्फवृष्टी title=

जम्मू-काश्मीर : श्रीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर दुसरीकडे बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी झालेय.

श्रीनगरमध्ये पावसामुळे आणि भूस्खलनामुळे हायवे बंद आहे. आणि यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. हायवे वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. 

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे शाळा आणि कॉलेजही बंद करण्यात आली आहेत. या दोन्ही घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.