गायकवाडांच्या विमान प्रवासावरील बंदी उठवण्याची शक्यता

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या हवाईबंदी प्रकरणावर तोडगा दृष्टीपथात आलाय. गायकवाड लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता आहे. यात पुन्हा असं वर्तन होणार नाही, असं आश्वासन ते देतील. त्यानंतर लगेच त्यांच्यावरची बंदी मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. 

Updated: Apr 6, 2017, 04:27 PM IST
गायकवाडांच्या विमान प्रवासावरील बंदी उठवण्याची शक्यता title=

नवी दिल्ली : शिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या हवाईबंदी प्रकरणावर तोडगा दृष्टीपथात आलाय. गायकवाड लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याची शक्यता आहे. यात पुन्हा असं वर्तन होणार नाही, असं आश्वासन ते देतील. त्यानंतर लगेच त्यांच्यावरची बंदी मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. 

आज लोकसभेत यावरून गोंधळ झाला. कामकाज तहकूब झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षांसोबत शिवसेनेचे मंत्री अनंत गिते, खासदार आनंदराव अडसूळ, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते. यावेळी अनंत गिते आणि हवाई वाहतूक मंत्री गजपती राजू यांच्यात झटापटही झाली.

तत्पुर्वी मारहाण प्रकरणी गायकवाडांनी लोकसभेत निवेदन करून स्पष्टिकरण दिलं. तर रवींद्र चव्हाणांवरची बंदी मागे घेण्यात आली नाही, तर NDA बैठकीला न जाण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे.