रेल्वे बजेट आणि मुंबईकरांच्या अपेक्षा

आतापर्यंत मुंबईकरांना रेल्वे बजेटनं म्हणावं तसं कधीच काही दिलं नाही. 8 जुलैला सादर होणा-या रेल्वे बजेटकडून मध्य रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या अनेक अपेक्षा आहेत.

Updated: Jul 7, 2014, 01:17 PM IST
रेल्वे बजेट आणि मुंबईकरांच्या अपेक्षा title=

मुंबई : आतापर्यंत मुंबईकरांना रेल्वे बजेटनं म्हणावं तसं कधीच काही दिलं नाही. 8 जुलैला सादर होणा-या रेल्वे बजेटकडून मध्य रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या अनेक अपेक्षा आहेत.

रोज हजारो मुंबईकर ज्यामधून मुंगीसारखे प्रवास करतात ती ही मध्य रेल्वे. रोज मरे, त्याला कोण रडे अशीच तिची आतापर्यंतची ओळख आहे आणि आतापर्यंत तिच्या पदरीही अपेक्षाभंग करणारं बजेटच तिच्या नशिबी आलंय.

आता मात्र अच्छे दिन येणार, म्हणून मुंबईकरांच्या अपेक्षाही उंचावल्यायत, मध्य रेल्वेचे वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प यंदा तरी मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. 

दादरची गर्दी कमी करण्यासाठी परळ टर्मिनस मर्गी लागणं अपेक्षित आहे.

ठाणे ते सीएसटी या मर्गाचे डीसी ते एसी विद्युत परीवर्तन झाल्यास नवीन लोकल ट्रेन येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मेट्रोच्या वाढत्या गर्दीमुळे घाटकोपर रेल्वे स्टेशनची क्षमता वाढवणं गरजेचे आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे स्टेशनवरच्या सुविधा वाढवल्या तर प्रवाशांवर अनंत उपकार होतील. ठाणे, कल्याण अशा गर्दीच्या स्टेशन्सकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

जीवघेणी गर्दी कमी करण्यासाठी आता सगळ्या लोकल गाड्या  15 डब्याच्या व्हाव्यात, अशी परंपरागत मागणी आहे.

महिलांचा लोकल प्रवास दिवसेंदिवस असुरक्षित बनत चाललाय. त्यांच्या सुरक्षेच्या उपायांवर भर द्यायला हवा 
 
मध्य रेल्वे पार कर्जत, खोपोली, कसारा आणि पनवेल अशी पसरलीय. रोज प्रवास करणा-यांची संख्या तब्बल ३८ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरचा ताणही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.