संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

१६व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या सेशनमध्ये रेल्वे बजेट आणि अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी वाढती महागाईवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.  

Updated: Jul 7, 2014, 09:09 AM IST
संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन   title=

नवी दिल्ली : १६व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या सेशनमध्ये रेल्वे बजेट आणि अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी वाढती महागाईवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.  

सोळाव्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वाचं लक्ष लागलंय. मोदी सरकार काय महत्वाचं निर्णय घेणार याकडं उद्योग जगताचंही लक्ष आहे. हे अधिवेशन १४ ऑगस्टपर्यंत असणार आहे. या अधिवेशनात २८ सत्र आणि १६८ तास कामकाज होणं अपेक्षित आहे. 

सध्या विविध मंत्रालयांच्या स्थायी समित्यांची स्थापना झाली नसल्यानं विविध मंत्रालयाच्या निधीबाबतच्या मागण्या संसदेत चर्चा होऊन दोन्ही सभागृहामध्ये ३१ जुलैपर्यंत मंजूर केल्या जातील. 

८ जुलै रोजी रेल्वे बजेट संसदेत मांडलं जाणार आहे. १० तारखेला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

त्याचप्रमाणे पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीसाठी २८ मे रोजी लागू केलेला वटहुकूम आणि आंध्र प्रदेश पुनरर्चना वटहुकूम आणि २०१४ अंतर्गत पोलावरम प्रकल्पाबाबत काढलेला वटहुकूम यांची विधेयकेही या सत्रात मांडण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.