म्हणून राहुल गांधीचं नाव गिनीज बुकात जाणार?

२७ निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं नाव गिनीज बुकात जावं अशी मागणी मध्य प्रदेशच्या होशंगाबादमधल्या एका विद्यार्थ्यानं केली आहे.

Updated: Mar 21, 2017, 04:56 PM IST
म्हणून राहुल गांधीचं नाव गिनीज बुकात जाणार? title=

होशंगाबाद : २७ निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचं नाव गिनीज बुकात जावं अशी मागणी मध्य प्रदेशच्या होशंगाबादमधल्या एका विद्यार्थ्यानं केली आहे. द फायनानशियल एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.

विशाल दिवाणं असं या विद्यार्थ्याचं नावं आहे. राहुल गांधींची नोंद गिनीज बुकात व्हावी या मागणीसाठी विशालनं गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांमधल्या निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. तर गोवा आणि मणिपूरमध्ये सर्वाधिक जागा जिंकल्यानंतरही काँग्रेसला स्वत:चा मुख्यमंत्री बसवण्यात अपयश आलं. पंजाबमध्ये मात्र कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेसने मुसंडी मारत स्वबळावर सत्ता स्थापन केली. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x