www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तराखंड प्रकरणावरुन झालेल्या टीकेमुळे राहुल गांधी आजपासून उत्तराखंड राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या देहराडूनमध्ये असलेल्या नियंत्रण कक्षालाही भेट देतील. यादरम्यान त्यांची भेट तेथील लोकांशीही होऊ शकते.
राहुल गांधी यांनी आज पार्टी अध्यक्षा सोनिया गांधीसोबत दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयात उत्तराखंडातील लोकांसाठी आवश्यक वस्तूंनी भरलेल्या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. बऱ्याच दिवसापासून राहुल गांधीना उत्तराखंडाच्या दौऱ्यावरुन बोल लावण्यात येत होते. त्याचबरोबर काँग्रेस प्रवक्त्यांना याविषयी पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड देताना नाकी नऊ येत होते. काँग्रेसने या मुद्द्याला खोडून काढत असं म्हटलं की, याक्षणी दौऱ्यापेक्षा तिकडे मदतीच्या रुपाने काय करता येईल याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.
आवश्यक वस्तूंनी भरलेल्या गाड्या उत्तराखंडला रवाना झाल्यानंतर वाहतूक मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांनी सांगितल की, आम्ही राहुल गांधी यांची प्रेरणा आणि सोनिया गांधी याच्या नेतृत्वाने काम करत आहोत. मात्र आज राहुल गांधी स्वतः उत्तराखंडाला भेट देणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.