www.24taas.com, झी मीडिया , नवी दिल्ली
मे क्या बोल रहा हुँ | ये क्या बोल रहा हे| वाली मुलाखत चांगलीच फसल्यानतंर आता मुलाखतीपूर्वी राहुल गांधी अभ्यास करूनच मुलाखतीला सामोरे जाणार असल्याचे समजते.
राहुल गांधींच्या अभ्यासासाठी वरिष्ठ काँग्रेस नेत्याची नियुक्ती केली जाणार आहे. प्रियंका गांधी म्हणजेच राहुलबाबांच्या दीदी देखिल या अभ्यासात राहुल गांधींची मदत करणार आहेत.
यानंतर मोठ्या मुलाखती राहुल गांधी देणार नाहीत. फार-फारतर ३० ते ४५ मिनिटांचे मुलाखती राहुल गांधी देणार आहेत. या मुलाखतींमध्ये काँग्रेसची विचारधारा आणि तत्वांचा समावेश असेल. राहुल गांधी यांच्या देहबोलीवर देखिल लक्ष देण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर बरेच वाद झाले होते. शीख दंगलीत काही काँग्रेस सदस्य सामिल झाल्याच्या विधानामुळे राहुल गांधींविरूद्ध शीख संघटनांनी आंदोलन केले होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.