'खून की दलाली'वर राहुल गांधींची सारवासारव

पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या हौतात्म्याची दलाली करत असल्याची जळजळीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. 

Updated: Oct 7, 2016, 11:15 AM IST
'खून की दलाली'वर राहुल गांधींची सारवासारव title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या हौतात्म्याची दलाली करत असल्याची जळजळीत टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

या वक्तव्यावरून आता राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलं आहे. सर्जिकल स्ट्राईकला मी पाठिंबा दिला आहे. मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलं नाही. राजकीय पोस्टरवर लष्कराचा वापर करण्याला मात्र मी कधीच पाठिंबा देणार नाही, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.