अम्मांची प्रकृती सुधारण्यासाठी ट्विटरवरून प्रार्थना

जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह देशभरातून अनेकजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

Updated: Dec 5, 2016, 11:11 AM IST
अम्मांची प्रकृती सुधारण्यासाठी ट्विटरवरून प्रार्थना title=

नवी दिल्ली : जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह देशभरातून अनेकजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून अम्मांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वजण मिळुन प्रार्थना करू, असं म्हटलंय. तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनींही चिंता व्यक्त करतानाच, जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, असं म्हटलंय. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केलीय. जयललिता या माझ्या मैत्रिणीसारख्या आहेत. त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत, असं ट्विट ममता यांनी केलयं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघा महाराष्ट्र जयललिता यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलंय.