पंतप्रधान मोदींना आहे या गोष्टीची खंत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी साधला संवाद

Updated: Jun 26, 2016, 09:23 PM IST
पंतप्रधान मोदींना आहे या गोष्टीची खंत  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 21व्या मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बेकायदेशीररित्या संपत्ती बाळगणा-या नागरिकांनी आपल्याकडील अघोषीत संपत्ती 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करा अन्यथा कर बुडव्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मोदींनी दिला आहे.

मोदींनी व्यक्त केली खंत

देशात चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब साठवून ठेवा असंही ते म्हणाले. पण सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त दीड लाख लोकांचे उत्पन्न ५० लाखांहून अधिक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

मोदींनी केलं कौतूक

नियमित कराचा भरणा करणा-यांची भविष्यात काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले. स्मार्ट सिटीच्या घोषणेच्या वर्षपूर्तीनिमित्त पुण्यात आयोजित विविध प्रकल्पांच्या कार्यक्रमावेळी पुण्यातील चंद्रकांत कुलकर्णी या निवृत्त कर्मचार्यांने त्यांच्या निवृत्ती वेतनातील काही रक्कम स्वच्छ भारत मोहिमेसाठी दिली असल्याचा उल्लेख देखील मोदी यांनी ‘मन की बात‘मध्ये केला. तसंच पुण्यातील आयटी विभागातील विद्यार्थ्यांचंही मोदींनी कौतुक केलं.