राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचं निधन

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी याचं मंगळवारी निधन झालंय. शुभ्रा मुखर्जी यांनी १० वाजून ५१ मिनिटाला शेवटचा श्वास घेतला. 

Updated: Aug 18, 2015, 01:24 PM IST
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचं निधन title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी याचं मंगळवारी निधन झालंय. शुभ्रा मुखर्जी यांनी १० वाजून ५१ मिनिटाला शेवटचा श्वास घेतला. 

शुभ्रा मुखर्जी यांच्यावर दीर्घकाळापासून हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होता. राष्ट्रपतींच्या पत्नीच्या निधनावर अनेक राजनेत्यांनी शोक व्यक्त केलाय. 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी यांची तब्येत गेल्या शुक्रवारी अचानक बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीनं सेनेच्या रेफरल तसंच रिसर्च (आरआर) हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 

राष्ट्रपती भवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ्रा मुखर्जी यांना श्वास घेण्यात अडथळे जाणवत होते... प्रकृती खालावल्यानं त्यांना हॉस्पीटलमध्ये हलवणं गरजेचं होतं... हॉस्पीटलमध्ये त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांना त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.