पठानकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाचं घर तोडलं

पठानकोट हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनेंट कर्नल निरंजनच्या घरावर सरकारी बुलडोजर चालवण्यात आला आहे. बंगळुरुमध्ये असलेलं त्यांचं घर नाला बनवण्यासाठी सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव या मोहिमेत तोडण्यात आलं आहे.

Updated: Aug 11, 2016, 01:19 PM IST
पठानकोट हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाचं घर तोडलं title=

बंगळुरु : पठानकोट हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनेंट कर्नल निरंजनच्या घरावर सरकारी बुलडोजर चालवण्यात आला आहे. बंगळुरुमध्ये असलेलं त्यांचं घर नाला बनवण्यासाठी सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव या मोहिमेत तोडण्यात आलं आहे.

बंगळुरुमध्ये मागील महिन्यात पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी जमा झालं होतं. बंगळुरु सरकारने यामुळे नाल्यांचं डिमॉलिशन ड्राइव सुरू केलं. अधिकारऱ्यांचं म्हणणं आहे की, शहरामध्ये नाल्यांची कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. निरंजन कुमार यांचं घर वाचवण्यासाठी त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. ११०० घरांमध्ये त्यांचं ही घर येत होतं. 

निरंजन कुमारच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, कारवाई ही बिल्डरांवर झाली पाहिजे. कारण खरे गुन्हेगार तेच आहेत. लेफ्टनेंट कर्नल निरंजन कुमार हे पठानकोट एअरबेस येथे बॉम्ब निकामी करतांना शहीद झाले होते.