इस्रो आखतोय दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना

भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजे इस्रो दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना आखत आहे. या अंतर्गत पाच मे रोजी जीसॅट ९ उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. मात्र भारताचा शेजारी देश पाकिस्तान या मोहिमेत सहभागी नसेल. त्यामुळे पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातील इतर सर्व देशांना, या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.

Updated: Apr 15, 2017, 03:14 PM IST
इस्रो आखतोय दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना title=

श्रीहरीकोटा​ : भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजे इस्रो दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना आखत आहे. या अंतर्गत पाच मे रोजी जीसॅट ९ उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. मात्र भारताचा शेजारी देश पाकिस्तान या मोहिमेत सहभागी नसेल. त्यामुळे पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातील इतर सर्व देशांना, या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.

श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रावरुन हा उपग्रह सोडला जाणार आहे. १२ वर्षांहून अधिक काळ हा उपग्रह कार्यान्वित राहील अशी त्याची रचना करण्यात आली आहे. २०१४ मध्ये काठमांडू शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या उपग्रह प्रेक्षपणाची घोषणा केली होती.