चेन्नई : चेन्नईत चार महिलांनी आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि आश्चर्य म्हणजे या चारही महिलांचा पती एकच आहे. पाचव्या पत्नीबरोबर आपला पती पळून गेल्याची तक्रार या चौघींनी केलीये.
४२ वर्षे वय असलेला अरुणन चेन्नई पोलीस खात्यात हवालदार म्हणून नोकरी करतात. त्यांची यापूर्वी चार लग्ने झालेली आहेत. आता ते पुन्हा एका तरुणीसोबत पळून गेल्याचे या चारही महिलांनी तक्रारीत म्हटलेय.
त्यांच्या एका पत्नीने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय तर दुसऱ्या पत्नीने हुंड्याची मागणी आणि पुनर्विवाह यांसारखे गुन्हे दाखल केले आहेत.
अरुणन यांनी फसवणुकीने लग्न केल्याचे या चारही महिलांच म्हणण आहे. त्यांनी एकीला आपल्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगून लग्न केले. तर एकीला आपले लग्नच झाले नसल्याचे सांगितले. या पत्नींकडून त्यांनी ४० लाख रुपये घेऊन तो पळाला आहे. पोलीस आता त्याचा शोध घेत आहे