उज्जैन : येथे रस्ता अपघातात एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आपला राग कुटुंबीयांवर लाठीमार करत काढला. मारु नका, अशी विनावणी करणाऱ्या महिलांना पळून पळून मारहाण केली. याचा एक व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल होत आहे.
शनिवारी एका चार वर्षीय मुलगा प्रदीप रायकवार याला एका बसने उडविले. जखमी प्रदीपचा मृत्यू रुग्णालयात झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी बस चालक-वाहकाला मारहाण केली. तसेच मृतदेह रस्त्यावर ठेवून राडा केला. बस चालकवर कारवाई करण्याची मागणी केली. आक्रमक कुटुंबातील काही सदस्यांचा हंगामा सुरुच होता. त्यावेळी पोलिसांनी जोरदार लाठीमार केला.