जुन्या नोटा कमिशनवर बदलून देणारे गजाआड

जुन्या १००० आणि ५०० च्या नोट बंद होऊन २४ दिवस उलटले आहेत. काळापैसा पांढरा करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी करत आहेत. काही लोकांनी तर गरीब लोकांना कमिशन देऊन काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत केला आहे.

Updated: Dec 3, 2016, 10:43 PM IST
जुन्या नोटा कमिशनवर बदलून देणारे गजाआड title=

लखनऊ : जुन्या १००० आणि ५०० च्या नोट बंद होऊन २४ दिवस उलटले आहेत. काळापैसा पांढरा करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी करत आहेत. काही लोकांनी तर गरीब लोकांना कमिशन देऊन काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करत केला आहे.
 
नीमच पोलिसांनी कनावटी रोडवर ४ लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १०० आणि ५० च्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहे. पोलिसांनी सांगितलं की, यांच्याकडून जवळपास ५० लाखांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

हे लोकं जुन्या १००० आणि ५०० च्या नोटा २१ टक्के कमिशनवर बदलून देत होते. अशा प्रकारे एक प्रकारचा धंदा सुरु केलेल्या या लोकांनी पोलिसांनी गजाआड केलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.