सोशल वेबसाईटचा दुरुपयोग, अटक करून पोलिसांनी 'फेसबुक'वर दिली माहिती

सोशल वेबसाईट 'फेसबुक'वर हिंदू देवी-देवतांवर टीका करणारा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल उत्तरप्रदेश पोलिसांनी एकाला अटक केलीय. 

Updated: Oct 7, 2015, 05:50 PM IST
सोशल वेबसाईटचा दुरुपयोग, अटक करून पोलिसांनी 'फेसबुक'वर दिली माहिती title=

उत्तरप्रदेश : सोशल वेबसाईट 'फेसबुक'वर हिंदू देवी-देवतांवर टीका करणारा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल उत्तरप्रदेश पोलिसांनी एकाला अटक केलीय. 

उत्तर प्रदेश पोलिसांनी याबद्दल आपल्या विभागाच्या 'फेसबुक' पेजवर याबद्दल माहिती दिलीय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तकीन आहे. हा व्यक्ती जेवर भागातील रहिवासी आहे. त्याला गौतम बुद्ध नगरमधून अटक करण्यात आलीय. 'मुस्तकीननं सोशल वेबसाईटवर हिंदू देवी-देवतांच्या फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती' असं पोलिसांनी म्हटलंय. 

जातीय सलोखा राखण्यासाठी पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेनं घेतलंय. आरोपीवर योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.