पंतप्रधानांसमोर तोंड दाबून `त्याला` बाहेर काढलं...

नवी दिल्लीत विज्ञान भवनात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमात एका व्यक्तीने गोंधळ घातला. म्हणून `त्याचं` तोंड दाबून त्याला बाहेर काढण्यात आलं.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 29, 2014, 04:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नवी दिल्लीत विज्ञान भवनात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यक्रमात एका व्यक्तीने गोंधळ घातला. म्हणून `त्याचं` तोंड दाबून त्याला बाहेर काढण्यात आलं.
`वक्फ विकास महामंडळा`चा हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमासाठी यूपीए अध्यक्ष सोनिया गांधीही उपस्थित होत्या. कार्यक्रमात भाषण करताना वक्फ नियमावलीत आमच्या सरकारने सकारात्मक बदल केला... यामुळे अल्पसंख्याक समाजाचा विकास झाल्याचं विधान पंतप्रधानांनी केलं. त्यावर प्रेक्षकातून एका नाराज झालेल्या व्यक्तीने उभं राहून पंतप्रधानांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत अल्पसंख्याक समाजाचा विकास झालाच नसल्याचं सांगत पंतप्रधानांना जाब विचारायला सुरुवात केली. सरकारने अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्याने केला.
यावेळी, सुरक्षा रक्षकांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आपला विरोध कायम ठेवला. अखेरीस त्याचं तोंड दाबत त्याला विज्ञान भवनातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं. यावर, उपस्थितांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करून या कृत्याला जोरदार विरोध दर्शविलाय.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.