नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉल तोडून शुक्रवारी विमानतळावर स्वतः पोहचले.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांना विमानतळावर जाण्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. सामान्य वाहतुकीत पंतप्रधान विमानतळावर पोहचले.
पंतप्रधान मोदी यांनी VVIP कल्चरला बाजूला ठेऊन सामान्य ट्रॅफीकमध्ये लोककल्याण मार्गाने दिल्ली एअरपोर्टला पोहचले. त्यानंतर त्यांनी स्वतः शेख हसीना यांचे स्वागत केले.
बांगलादेशच्या पंतप्रधान चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत. त्या सात वर्षांनंतर भारतात आल्या आहेत.
हसीना शनिवारी मोदीशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दरम्यान भारत सैनिक साहित्य खरेदी करण्यासाठी ५० कोटी डॉलर बांगलादेशला कर्जाऊ देण्याची घोषणा होऊ शकते.
पंतप्रधान पदाच्या आपल्या कार्यकाळात हसीना पहिल्यांदा द्विपक्षीय भारत दौऱ्यावर आल्या आहेत.