ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलं अनेकांना मागे

 ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असण्याचा मान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटकावला आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांचे सर्वाधिक फॉलोअर्स होते. मात्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या काही आठवड्यात झपाट्यानं वाढली आहे. 

Updated: Aug 26, 2016, 10:47 AM IST
ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलं अनेकांना मागे title=

मुंबई : ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर असण्याचा मान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटकावला आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांचे सर्वाधिक फॉलोअर्स होते. मात्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या काही आठवड्यात झपाट्यानं वाढली आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या 22 मिलियन आहे. तर नरेंद्र मोदींनी 22 मिलियनचा आकडा पार केलाय. त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 22.1 मिलियन इतकी झाली आहे. तर शाहरुख खान फॉलोअर्सच्या बाबतीत तिस-या क्रमांकावर असून त्याला 17 मिलियन लोक फॉलो करतात. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे जगातले सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकारणी आहेत. ओबामांपाठोपाठ सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या राजकारण्यांच्या यादीत मोदींचा नंबर दुसरा आहे.