तयारीसाठी वेळ दिला नसल्याचा विरोधकांना जास्त राग - मोदी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी राज्यसभेत  केलेल्या टीकेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोख उत्तर दिलं. 

Updated: Nov 25, 2016, 11:15 AM IST
तयारीसाठी वेळ दिला नसल्याचा विरोधकांना जास्त राग - मोदी title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी राज्यसभेत  केलेल्या टीकेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोख उत्तर दिलं. 

सरकारनं पुर्ण तयारी केली नाही यावर काहींचा अक्षेप आहे मात्र त्यांना तयारी करण्यासाठी वेळ दिला नाही याचा जास्त राग असल्याचं मोदी म्हणाले. 

मी तयारी करण्यासाठी 72 तास दिले असते तर विरोधकांनी माझी स्तुती केली असती असा टोलाही मोदींनी विरोधकांना यावेळी लगावला. 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.