नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आणि त्यांच्या सरकारने काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक ही काही अचानक नाही केली. यासाठी एक गुप्त योजना बनवली गेली होती. ६ महिने या योजनेवर काम केलं गेलं. या निर्णयावर पीएम मोदींना अनेकांनी सल्ला दिल्याचं म्हटलं जात आहे.
५०० आणि १००० ची नोट रद्द करण्याचा मोदी सरकारचा हा निर्णय खूप अभ्यास केल्यानंतर घेण्यात आला. 6 महिने यावर काम चाललं. हा निर्णय कसा लागू करावा यासाठई जवळपास २ महिने चर्चा आणि बैठका झाल्या. जेव्हा मंगळवारी हा निर्णय घोषित करण्याची वेळ आली तो पर्यंत हा निर्णय गुपीत ठेवण्यात आला. रिजर्व्ह बँकेचे गवर्नर यांना देखील पंतप्रधानांच्या घोषणेनंतर याची माहिती झाली.
पुण्यातील एका संस्थेने असा दावा केला आहे की त्यांच्या सल्लानंतर हा निर्णय घेण्यात आला. अर्थक्रांती संस्थेमध्ये अनेक इंजिनियअर आणि सीए जोडलेले आहेत.
काळा पैसा आणि खोट्या नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मोदी सरकारनं पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामागे एका मराठी माणसाचं डोकं आहे. पुण्याचे अनिल बोकील यांनी पंतप्रधानांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला दिला होता.
इंजिनिअर असलेले अनिल बोकील हे अर्थक्रांती या संस्थेचे सदस्य आहेत. 2014मध्ये लोकसभा निवडणुकांच्या आधी अनिल बोकील यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी बोकील यांना मोदींच्या भेटीसाठी फक्त 9 मिनीटांचा वेळ मिळाला होता, पण जेव्हा भ्रष्टाचार आणि खोट्या नोटांबद्दल बोकील जेव्हा बोलायला लागले तेव्हा मोदींनी दोन तासांपर्यंत हा प्रस्ताव ऐकला.
मोदींबरोबरच बोकील यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचीही भेट घेतली होती. राहुल गांधींनी मात्र या प्रस्तावावर बोलण्यासाठी बोकील यांना फक्त 15 सेकंदांचा वेळ दिला.