जेव्हा पंतप्रधान मोदी संसदेच्या कँटींगमध्ये जेवले...

संसदेचं बजेट अधिवेशन सुरू आहे. आज एक आश्चर्यकारक दृश्य संसदेच्या कँटींगमध्ये पाहायला मिळालं. चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या कँटींगमध्ये लंच केलं आणि स्वत: पैसेही दिले. 

Updated: Mar 2, 2015, 03:40 PM IST
जेव्हा पंतप्रधान मोदी संसदेच्या कँटींगमध्ये जेवले... title=

नवी दिल्ली: संसदेचं बजेट अधिवेशन सुरू आहे. आज एक आश्चर्यकारक दृश्य संसदेच्या कँटींगमध्ये पाहायला मिळालं. चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या कँटींगमध्ये लंच केलं आणि स्वत: पैसेही दिले. 

असं पहिल्यांदा घडलंय की, कँटींगमध्ये पंतप्रधान मोदींनी लंच केलंय. त्यांनी कँटींगच्या मॅनेजरला सांगितलं की, मला तेच जेवायला वाढा जे सर्वांना वाढता. काही वेगळं बनवू नका. त्यानंतर आरामात त्यांनी लंच केलं आणि स्वत: पैसे मोजले. पंतप्रधानांनी लंचचे २९ रुपये दिले.

ते कँटींगमध्ये २५ मिनिटं उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी व्हिजिटर डायरीमध्ये अन्नदाता सुखी भव:!, असं लिहिलं. 

पंतप्रधानांनी लंच दरम्यान सरसो का साग, डाळ, भात आणि राजमा, सलाद इत्यादींचा आस्वाद घेतला. पंतप्रधानांनी व्हेज थाळी मागवली होती. जेवतांना पंतप्रधानांनी आपल्या जवळपास बसलेल्या खासदारांची चौकशीही केली. 

मोदी संसदेतील पहिल्या माळ्यावर असलेल्या ७० नंबर रूममध्ये अचानक पोहोचले आणि तिथं त्यांनी लंच केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.