लखनऊ : समाजवादी पार्टीतील यादवीमुळे आधीच उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलंय त्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची लखनऊमध्ये महारॅली होतीय.
पंतप्रधानांच्या या महारॅलीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह, केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षातील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. लवकरच उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे.
त्यामुळे रमाबाई मैदानावर होत असलेल्या या सभेत पंतप्रधान पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. या रॅलीसाठी लखनौमध्ये जय्यत तयारी करण्यात आलीये.
या मैदानाची क्षमता केवळ पाच लाख माणसांची आहे. मात्र रॅलीसाठी दहा लाख भाजप कार्यकर्ता या रॅलीत सहभागी होतील असा अंदाज बांधला जातोय.. त्यामुळे शहरातील वाहतुकीच्या मार्गातही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेत.