'स्टार्टअप इंडिया' मोहिमेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतल्या स्टार्टअप कंपन्यांचं 48 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ उपस्थीत होतं.

Updated: Jan 16, 2016, 11:17 PM IST
'स्टार्टअप इंडिया' मोहिमेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतल्या स्टार्टअप कंपन्यांचं 48 सदस्यीय प्रतिनिधी मंडळ उपस्थीत होतं.

विज्ञान भवनमध्य हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी स्टार्टअप कंपन्यांसाठी सरकारनं देऊ केलेल्या विविध सुविधांची माहिती नरेंद्र मोदींनी उपस्थितांना दिली. यात आयकरात सवलत, तसंच पोर्टल आणि ऍपची सुविधाही स्टार्टअपसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

स्टार्ट अपसाठी लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार असून स्टार्टअपला तीन वर्षांसाठी कर माफ करण्यात येणार आहे. तसेच, पेटंट फी ८० टक्क्यांनी कमी करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिली.