जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरसाठी तब्बल 80 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.
श्रीनगरच्या शेर-ए-कश्मीर स्टेडियममध्ये जनतेला संबोधित करताना मोदींनी पॅकेज जाहीर केलं. ‘हे पॅकेज तर केवळ सुरुवात आहे, दिल्लीचा खजिनाच नाही, तर हृदयही तुमचंच आहे’ असं म्हणत जनतेचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला.
काश्मीरने खूप काही सहन केलं आहे, मात्र आता पुन्हा त्याला स्वर्ग करायचं आहे’ अशी मनोकामनाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय. काश्मीरसाठी जगातल्या कोणाच्याही सल्ल्याची किंवा विश्लेषणाची गरज नसल्याचंही मोदींनी ठासून सांगितलं.
जम्मू-काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बगलीहारच्या हायड्रो पॉवक प्रोजेक्टसह तीन प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या दौऱ्याचा अपक्ष आमदार इंजीनियर रशीद यांनी काळे फुगे सोडून विरोध केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यत घेतलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.