नवी दिल्ली: स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकारनं देशातली सगळ्यात स्वच्छ अशा 10 शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार कर्नाटकमधलं मैसुर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर आहे.
या यादीमध्ये महाराष्ट्रातल्याही 2 शहरांचा समावेश आहे. या यादीत पिंपरी-चिंचवड नवव्या क्रमांकावर तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे.
स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणासाठी देशातल्या 73 शहरांचा समावेश करण्यात आला होता. स्वच्छ सर्वेक्षण 2016 च्या अंतर्गत या शहरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. या 73 शहरांनी टॉयलेट आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी काय पावलं उचलली हे या सर्वेक्षणात पाहण्यात आलं.
1 मैसुर (कर्नाटक)
2 चंदीगड
3 तिरुचिरापल्ली (तामिळनाडू)
4 एनसीटी (नवी दिल्ली)
5 विशाखापट्टणम( आंध्र प्रदेश)
6 सुरत (गुजरात)
7 राजकोट (गुजरात)
8 गंगटोक (सिक्कीम)
9 पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)
10 मुंबई (महाराष्ट्र)