पीएफ आता ऑनलाईन ट्रान्सफर

तुम्ही नोकरी बदलली किंवा नोकरी सोडली तर केंद्रीय भविष्य निधीची (पीएफ) काळजी करू नको. आता पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करता येऊ शकतो किंवा काढणे सुलभ झाले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2013, 03:13 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
तुम्ही नोकरी बदलली किंवा नोकरी सोडली तर केंद्रीय भविष्य निधीची (पीएफ) काळजी करू नको. आता पीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करता येऊ शकतो किंवा काढणे सुलभ झाले आहे.
पीएफ काढण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो शिवाय कटकट होत नाही. मात्र, तुम्हाला थोडीसी प्रतिक्षा करावी लागणार आह. १ जुलैपासून ऑनलाईन अर्ज करू शकता. तशी सुविधा उपलब्ध होत आहे.

पीएफच्या केंद्रीय केंद्रीय भविष्य निधी कमिश्नर अनिल स्वरूप यांनी याबाबत माहिती दिली. ऑनलाईन पीएफचे काम हलके आणि सहज सुलभ व्हावे यासाठी सेंट्रले क्लिअरन्स हाऊस उभारण्यात येणार आहे. या हाऊसचे काम जुलैपर्यंत सुरू होईल. त्यामुळे पीएफ खातेधारक आपले पैसे काढू शकतो किंवा पैसे ट्रान्सफर करू शकतो. यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.

ज्यावेळी कर्मचारी नोकरी बदलतो. त्यावेळी पीएफ ट्रान्सफर करण्याची समस्या निर्माण होते. आता ही समस्या दूर होण्यासाठी सेंट्रल क्लिअरन्स सुविधा मदत करणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर स्टेटस सहज इंटरनेटवर पाहू शकता येणार आहेत. तसेच पुढच्या वर्षी ग्राहकांना कायमस्वरूपी खातेनंबर देण्यात येईल, अशी माहिती अनिल स्वरूप यांनी दिली.