www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पीएफ धारकांना चांगला परतावा मिळणार आहे. कारण पीएफवर ८.७५ टक्के व्याज देण्याचा विचार सुरू आहे. हा निर्णय चालू वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएफ धारकांना भविष्य निर्वाह निधीचे चांगले पैसे मिळणार आहेत.
सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी ०.०२५ टक्के जास्त व्याज देण्याचा विचार सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी हा निर्णय होण्याची शक्यता आहे. कामगार व रोजगार राज्यमंत्री के सुरेश यांनी बुधवारी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना २०१३-२०१४ या वर्षासाठी पीएफ ८.७५ टक्के व्याज देण्याची शिफारस करण्यात आली आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे पीएफवर जास्त व्याज मिळण्याची शक्यता आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय मंडळ ट्रस्टीज (सीबीटी) यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत २०१३-२०१४ या वर्षासाठी पीएफ ८.७५ टक्के व्याज देण्याची शिफारस करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ०.२५ टक्के व्याज वाढविण्यात आले होते. त्यामुळे ८.५० ट्क्के व्याज मिळाले. आता पुन्हा ०.०२५ टक्के जास्त व्याज देण्याचा विचार सुरू आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.