ऑईल कंपन्यांविरुद्ध पेट्रोलपंप मालक आक्रमक, उद्या 'हाफ डे' बंद

देशातली पेट्रलपंप मालकांनी पुन्हा एकदा बंदचं हत्यार उपसलंय. आपल्या विविध मागण्यासाठी पेट्रोलपंप मालकांनी ११ एप्रिलरोजी एका शिफ्टमध्ये आपले पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Apr 10, 2015, 11:19 AM IST
ऑईल कंपन्यांविरुद्ध पेट्रोलपंप मालक आक्रमक, उद्या 'हाफ डे' बंद title=

नवी दिल्ली: देशातली पेट्रलपंप मालकांनी पुन्हा एकदा बंदचं हत्यार उपसलंय. आपल्या विविध मागण्यासाठी पेट्रोलपंप मालकांनी ११ एप्रिलरोजी एका शिफ्टमध्ये आपले पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

११ एप्रिलला देशातील एकही पेट्रोलपंप मालक डिझेल आणि पेट्रोलची खरेदी करणार नाही. यामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होवून पुढील दोन ते तीन दिवस त्याचे परिणाम जाणवू शकतात. देशातील हजारो पंपचालक यात सहभागी होतील दरमहिन्याच्या एक आणि १६ याच तारखांना विक्रीदरातील चढ उतार करण्याचे ऑईल कंपन्यांनी मान्य केलेलं असताना ऑईल कंपन्या कोणत्याही तारखांना दर बदलत असल्यानं पेट्रोल पंप मालकांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.

यामुळे दर बदलांच्या तारखांमध्ये सातत्य आणि शिस्त आणावी अशा अनेक मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.