www.24taas.com, नवी दिल्ली
देशातील तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत २ रुपयांनी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून या ही दरकपात लागू होणार आहे.
फेब्रुवारीपासून दोन वेळा पेट्रोलच्या किंमतीत वाढ केल्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
यापूर्वी १६ फेब्रुवारी रोजी दीड रुपयांनी वाढवले होते, त्यानंतर गेल्या २ मार्च रोजी १ रुपया ४० पैशांनी पेट्रोलमध्ये वाढ करण्यात आली होती. ही वाढ व्हॅट सोडून करण्यात आली होती.
पेट्रोलचा जुना दर आणि नवी दर (शहरानुसार)
मुंबई - जुना दर ७७.६६ । नवा दर ७५.६६
ठाणे - जुना दर ७६.९८ । नवा दर ७४.९८
पुणे - जुना दर ७७.९२ । नवा दर ७५.९२
नाशिक - जुना दर ७८.१२ । नवा दर ७६.१२
नागपूर - जुना दर ८१.०९ । नवा दर ७९.०९
औरंगाबाद- जुना दर ७५.७४ । नवा दर ७७.७४
ताजा कलम - वरील दरातून व्हॅट वगळण्यात आला नाही.