पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त

पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोलमध्ये दोन रुपयांनी कपात झाली आहे. मध्यरात्रीसून हे दर लागू होणार आहे.

Updated: Jul 15, 2016, 09:14 PM IST
पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त title=

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त झाले आहे. पेट्रोलमध्ये दोन रुपयांनी कपात झाली आहे. मध्यरात्रीसून हे दर लागू होणार आहे.

पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे, तर डिझेल प्रति लिटर ४२ पैशांनी स्वस्त झाले आहे. इंधनाचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर दर १५ दिवसांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दराचा आढावा घेतला जातो. त्यानुसार आजचे हे दर बदललेले आहेत. 

या बदललेल्या दरांनुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ६२.५१ रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ५४.२८ रुपये असेल.