पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे.

Updated: Apr 30, 2017, 09:28 PM IST
पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ  title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होणार आहे. पेट्रोलचे भाव एक पैशांनी तर डिझेलचे भाव ४४ पैशांनी महाग झालं आहे. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

याआधी १ एप्रिलला पेट्रोल ३.७७ रुपये तर डिझेल २.९१ रुपयांनी स्वस्त झालं होतं. पण राज्य सरकारनं पेट्रोलवरील अधिभार वाढवल्यानं पेट्रोल तीन रुपयांनी महागलं.

दरम्यान उद्यापासून देशातल्या पाच शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर ठरणार आहेत. चंदीगड, उदयपूर, जमशेदपूर, पाँडेचेरी आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर ठरतील. या पाच शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला तर देशभरात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.