पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार!

नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी स्वस्त होण्याची शक्याता आहे.

Updated: Dec 22, 2015, 11:02 AM IST
पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार! title=

नवी दिल्ली : नव्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी स्वस्त होण्याची शक्याता आहे.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव दर वर्षातल्या नीचांकी पातळीवर पोहचलेत. ब्रेंट क्रूड काल कच्चा तेलाच्या बाजारात ३६ डॉलर आणि ९ सेंट्सचा प्रति बॅरलवर येऊन पोहचलं. २००४ नंतर प्रथमच ब्रेंट क्रूडनं ही पातळी गाठलीय.  

दरम्यान, या घसरणीमागे अल-निनोचा प्रभाव असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अमेरिकेत यंदा दरवर्षी पेक्षा थंडीचा कडाका कमी आहे. त्यामुळे याकाळात वाढणारी तेलाची मागणी यावर्षी वाढलेली नाही.

तिकडे ओपेक देश आणि अमेरिकेतील तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कुठलही कपात केलेली नाही. त्यामुळे मागणी पेक्षा पुरवठ्याचं प्रमाण वाढलंय. येत्या वर्षातही तेलच्या मागणी आणि पुरवठ्याचं गुणोत्तर असचं व्यस्त राहण्याची चिन्हं आहेत.

त्यामुळे यापुढेही कच्च्या तेलाचे भाव खालीच राहतील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी घसरतील असं चित्र आहे.