रेल्वे स्थानकांवर मिळणार २० रुपयांहूनही कमी किंमतीत जेवण

आता तुम्हाला रेल्वे स्थानकांवर स्वच्छ आणि पौष्टिक जेवण मिळणार आहे. अवघ्या २० रुपयांत तुम्ही हे जेवण विकत घेऊ शकता. आयआरसीटीसीने भारतीय रेल्वे नेटवर्क स्थानकांवर जन आहार कॅफेची सुरुवात केलीय.

Updated: Jan 3, 2016, 10:06 AM IST
 रेल्वे स्थानकांवर मिळणार २० रुपयांहूनही कमी किंमतीत जेवण title=

नवी दिल्ली : आता तुम्हाला रेल्वे स्थानकांवर स्वच्छ आणि पौष्टिक जेवण मिळणार आहे. अवघ्या २० रुपयांत तुम्ही हे जेवण विकत घेऊ शकता. आयआरसीटीसीने भारतीय रेल्वे नेटवर्क स्थानकांवर जन आहार कॅफेची सुरुवात केलीय.

या कॅफेत २० रुपयांत तुम्ही जेवण घेऊ शकता. सेल्फ सर्व्हिस मॉडेलवर आधारित ही सुविधा २४ तास सुरु राहणार आहे. येथे मिळणाऱ्या बऱ्याच पदार्थांच्या किंमती २० रुपयाहूनही कमी असतील. या काउंटरवर आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स आणि गरम पेयही उपलब्ध असतील. 

याशिवाय रिव्हर्स ऑसमोसिस प्रक्रियेने फिल्टर केलेले पाणीही उपलब्ध होणार आहे. या कॅफेत बसण्याची सुविधाही आहे.