हल्ल्यापूर्वी दहशतवाद्याने केलेले संभाषण टॅप

पंजाबमधल्या पठाणकोट एअरबेसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे, पाकिस्तनाचं हात असल्याचे पुरावे हाती आलेत. त्यामुळे भारताकडून पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न एक कॉलमुळे फेल होत असल्याचं दिसतंय. 

Updated: Jan 3, 2016, 09:48 AM IST
 हल्ल्यापूर्वी दहशतवाद्याने केलेले संभाषण टॅप title=

नवी दिल्ली : पंजाबमधल्या पठाणकोट एअरबेसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे, पाकिस्तनाचं हात असल्याचे पुरावे हाती आलेत. त्यामुळे भारताकडून पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न एक कॉलमुळे फेल होत असल्याचं दिसतंय. 

दहशतवाद्याची आई -  बेटा कहां हो
जैश ए मोहम्मदचा दहशतवादी - मै फिदायीन मिशन पर हूं
दहशतवाद्याची आई - जान देने से पहले खाना खा लेना!

सुरक्षा एजन्सीने इंटरसेप्ट केलेल्या या कॉलनमुळे पाकिस्तनचा नापाक चेहरा पु्न्हा जगासमोर आलाय. हे संभाषण पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी आलेल्या एक दहशतवाद्याचं त्याच्या आई सोबत झालेलं आहे. यातून हल्लात पाकिस्तानचा सरळ संबंध असल्याचे पुरावे मिळात. 

३१ डिसेंबरला पंजाबच्या एका अधिका-याचं अपहरण करून देशात दहशतवादी हल्ला करण्याचे संकेत दिले होते. अधिका-यांचं अपहरण करुन त्यांच्याच फोनवरून त्या दहशतवाद्यानं पाकिस्तानात असलेल्या आपल्या आईल फोन केल्याचं स्पष्ट झालंय. 

फोनवर बोलण झाल्यानंतर त्या दहशतवाद्यांनी पठानकोट एयरफोर्सवर भ्याड हल्ला केलाय. हा दहशतवादी हल्ला भारतीय जवानांनी तेवढ्यात ताकदीन परतावून लावला. हल्ल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय जवानांनी केलाय. 

पठानकोटवरील हल्ल्याची योजना जैश-ए-मोहम्मदचा मुखिया मौलाना मसूद अजहर आणि isiने मिळून तयार केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 1999 साली भारतीय विमान हायजॅक करून कंधारला नेऊन त्याबदल्यात तीन दहशतवादी सोडले होते. त्यात मसूद अजहरही होता. 

मसूद अजहरने जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना २००० साली बनवलीय. पाकिस्तानची संघटना ISIने जैश-ए-मोहम्मद पुन्हा उभी करण्याची व्यूहरचना आखली असण्याची शक्यता आहे. पठाणकोटवर दहशतवादी हल्ला सुरु असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी तिनिही सेना प्रमुखासोबत बैठक करत होते.

नवीन वर्षाच्या दुस-याचं दिवशी देशावर दहशतवादी हल्ला करून दहशतवाद्यांनी सुरक्षा एजन्सींपुढे  मोठं आव्हान निर्माण केलंय. सरकारमध्येही पाकिस्तानच्या संबंधविषयी हलचालांनी वेग आलाय.