तपासणीनंतर शताब्दी एक्सप्रेस रवाना

शताब्दी एक्स्प्रेस बॉम्बनं उडवणार असल्याची धमकी देण्यात आली होती. 

Updated: Jan 3, 2016, 10:21 AM IST
तपासणीनंतर शताब्दी एक्सप्रेस रवाना title=

नवी दिल्लीशताब्दी एक्स्प्रेस बॉम्बनं उडवणार असल्याची धमकी देण्यात आली होती. 

गाडीत बॉम्ब असल्याची माहिती मुंबई एटीएसनं दिल्यानंतर लखनऊ एक्स्प्रेसला गाझियाबादमध्ये थांबवून तपासणी करण्यात आली.

बॉम्बशोधक पथक, श्वानपथक आणि मेटल डिटेक्टर्सद्वारे गाडीची तपासणी करण्यात आली. त्यानंतर गाडी रवाना झालीय. इतर गाड्याही थांबवण्यात आल्या होत्या. त्याही आता रवाना करण्यात आल्यात