पतंजलीची आता हॉटेल क्षेत्रात उडी

 आधी विविध औषधं मग वेगवेगळी उत्पादनं यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद संस्था आता हॉटेलक्षेत्रातही उतरली आहे.

Updated: Apr 17, 2017, 05:08 PM IST
पतंजलीची आता हॉटेल क्षेत्रात उडी   title=

चंदीगड : आधी विविध औषधं मग वेगवेगळी उत्पादनं यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद संस्था आता हॉटेलक्षेत्रातही उतरली आहे. त्याचाच भाग म्हणून पतंजलीचं पौष्टिक नावाचं पहिलं शाकाहारी उपहारगृह चंदिगडमध्ये सुरु करण्यात आलं आहे. नुकतंच बाबा रामदेव यांच्या हस्ते या उपहारगृहाचं उद्घाटन करण्यात आलं.

पतंजलीच्या या हॉटेलमध्ये फक्त शाकाहारी जेवणच मिळेलं असं सांगण्यात येत आहे. या हॉटेलमध्ये वापरण्यात येणारी भांडी माती आणि तांब्याची आहेत. या हॉटेलचं मेन्यूकार्ड बाबा रामदेव यांच्या सल्ल्यानं तयार करण्यात आलं आहे.