१८० जागा मिळवणारा पक्ष सरकार स्थापन करेल- पवारांचं भाकीत

२०१४च्या निवडणुकीत जो पक्ष १८० जागा मिळवेल त्याला सरकार स्थापनेची संधी मिळेल असं भाकीत शरद पवार यांनी केलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 24, 2013, 11:28 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
२०१४च्या निवडणुकीत जो पक्ष १८० जागा मिळवेल त्याला सरकार स्थापनेची संधी मिळेल असं भाकीत शरद पवार यांनी केलंय.
काँग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत होणार असली तरीही प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचं पवार म्हणाले. विशेष म्हणजे पुढचं सरकार कोणाचं असेल यावर प्रादेशिक पातळीवरच्या नेत्यांचा फार मोठा प्रभाव असेल असं पवार म्हणालेत.
भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींची घोषणा केली असली तरीही त्याचा फारसा फायदा भाजपला होणार नाही असंही पवार म्हणालेत.
पवारांचं म्हणणं आहे की आघाडी आणि युतीच्या राजकारणात पंतप्रधान पदाचा उमेदवार असा असावा की ज्याला सर्व प्रादेशिक पक्षांनी स्वीकारलेलं असेल. पवार म्हणाले, “माझ्या मते लोकसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी, मुलायम सिंह, मायावती, नवीन पटनायक, नीतीश कुमार आणि जयललिता यांची भूमिका महत्त्वाची असेल”. शिवाय आपण काँग्रेस सोबतच आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.