www.24taas.com, जयपूर
अजमेर दर्गा शरीफच्या मुख्य दिवाणांनी पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांच्या दर्ग्याच्या भेटीला विरोध दर्शवलाय. तसंच जरी ते आले तरी त्यांच्या स्वागतासाठी आपण उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय.
काश्मिरात झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांची निघृण हत्या केल्यानंतर त्यांचे दर्ग्यात स्वागत केले जाऊ शकत नाही, असंही दिवाणांनी म्हटलंय. भारतीय सैनिकांचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानंन पहिल्यांदा ‘शहीद भारतीय सैनिका’चं शीर परत द्यावं, अशीही मागणी त्यांनी केलीय.
अशरफ अजमेर स्थित सूफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती यांच्या दर्ग्याला भेट देण्यासाठी अशरफ आज एका दिवसासाठी राजस्थानातील जयपूरमध्ये पोहचणार आहेत. संध्याकाळी चार वाजल्याच्या सुमारास ते इथं दाखल होतील.
सूत्रांच्या माहितीनुसार, अशरफ हे आज दुपारचं भोजन परदेश मंत्री सलमान खुर्शीद यांच्यासोबत जयपूरमध्येच करणार आहेत. त्यानंतर ते अजमेरसाठी रवाना होतील.