नावेदनंतर आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला गुजरातमध्ये अटक

अजमल कसाब, नावेद खान आणि आता शौकत अली... एका मीडिया रिपोर्टनुसार भारत जवानांनी आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला जिवंत पकडण्यात यश मिळवलंय. 

Updated: Aug 6, 2015, 05:07 PM IST
नावेदनंतर आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला गुजरातमध्ये अटक  title=

अहमदाबाद / श्रीनगर : अजमल कसाब, नावेद खान आणि आता शौकत अली... एका मीडिया रिपोर्टनुसार भारत जवानांनी आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला जिवंत पकडण्यात यश मिळवलंय. 

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बुधवारी नावेद खान या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला - शौकत अली याला भारतात अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय. शौकत अली याला गुजरातच्या कच्छच्या सीमेवर पकडण्यात आलंय. गुरुवारी सकाळी साडे सहा वाजता शौकत अलीला अटक करण्यात आलीय. 

बुधवारी दहशतवाद्यांनी बीएसएफच्या जवानांना निशाणा बनवलं होतं पण, या प्रयत्नात जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं तर दुसऱ्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. 

दुसरीकडे पाकिस्तानकडून सीमेवर सीजफायर उल्लंघन सुरूच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाककडून गुरुवारी पुंछ भागात पुन्हा गोळीबार करण्यात आलाय. पण, बीएसएफच्या जवानांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.