नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या खेरीज भाजपचे वरिष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी आणि ज्येष्ठ गायक येसूदास यांचाही समावेश पद्मविभूषणाच्या यादीत आहे. या खेरीज माजी लोकसभा अध्यक्ष कै. पी. एस. संगमा आणि सुंदरलाल पटवा यांना मरणोपरांत पद्मविभूषण देण्यात आला आहे.
यंदा पद्म पुरस्कारांच्या यादीत ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदा 120 मान्यवरांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यात यंदा अनुराधाताईंचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यापैंकी पन्नास टक्के लोक हे प्रकाशझोतात आलेले नाहीत, दुर्गम भागात वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या अनोळखी चेहऱ्यांचाही यंदा पद्मपुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे.
कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना यंदा पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 'झी मीडिया'च्या हाती आलेल्या यादीत प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि कैलाश खेर यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. त्याप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कास्यपदकाची कमाई करणाऱ्या साक्षी मलिकलाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. याशिवाय तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व समर्थपणे करणाऱ्या विराट कोहलीलाही यंदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
- अनुराधा पौ़डवाल, ज्येष्ठ पार्श्वगायिका
- कैलाश खेर, पार्श्वगायक
- सी नायर, बी बहादूर यांना पद्मश्री
- भावना सोमय्या, अनुराधा कोईराला यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर
- हॉकीपटू श्रीजेश, थाळीफेकपटू विकास गौडा यांना पद्मश्री
- दीपा कर्माकर, साक्षी मलिक, विराट कोहलीला पद्मश्री
माणुसकी दाखवत इतरांचा जीव वाचवणाऱ्यांना जीवन रक्षा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारांत चार पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेत.
1. उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार - गोविंद लक्ष्मण तुपे
2. जीवन रक्षा पदक - तेजस ब्रिजलाल सोनावणे
3. जीवन रक्षा पदक - मनोज सुधाकरराव बऱ्हाटे
4. जीवन रक्षा पदक - निलकांत रमेश हरिक्रांत्रा