नोट बदलायला गेलेला तरूण बॅंक मॅनेजरला चावला

दोन दिवस नोटा बदलून न मिळाल्यामुळे दोन तरुण चक्क बँक मॅनेजरला चावलेत. उत्तर प्रदेशच्या सलेमपूरमध्ये ही घटना घडली आहे. युनियन बँकेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून नोटांचा तुटवडा आहे. यामुळे रज्जू आणि हमीद यांना नोटा बदलून मिळाल्या नाहीत. याचा राग मनात धरून या दोघांनी बँक मॅनेजर सुनील जयस्वाल यांच्यावर हल्ला केला.

Updated: Nov 18, 2016, 09:24 PM IST
नोट बदलायला गेलेला तरूण बॅंक मॅनेजरला चावला title=

सलेमपूर : दोन दिवस नोटा बदलून न मिळाल्यामुळे दोन तरुण चक्क बँक मॅनेजरला चावलेत. उत्तर प्रदेशच्या सलेमपूरमध्ये ही घटना घडली आहे. युनियन बँकेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून नोटांचा तुटवडा आहे. यामुळे रज्जू आणि हमीद यांना नोटा बदलून मिळाल्या नाहीत. याचा राग मनात धरून या दोघांनी बँक मॅनेजर सुनील जयस्वाल यांच्यावर हल्ला केला.

या दोघांनी मॅनेजरबरोबरच डेप्युटी मॅनेजरलाही मारहाण केली. या हल्ल्यात जखमी झालेले मॅनेजर सुनील जयस्वाल यांना हाताच्या उपचारासाठी सीएचसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

याप्रकरणी पोलिसांनी रज्जू आणि हमीद या दोघांना अटक केली आहे. या प्रकारामुळे बँकेत गोंधळ झाला होता, तसंच एक तासासाठी बँकेचे व्यवहार बंद करण्यात आले होते.