आयकर विभाग, इडीची नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई

नोटाटंचाईनंतर आता आयकर विभागाने आणि इडीने नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या करोल बाग इथून पाचजणांकडून सव्वा तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Updated: Dec 14, 2016, 04:58 PM IST
 आयकर विभाग, इडीची नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई  title=

नवी दिल्ली : नोटाटंचाईनंतर आता आयकर विभागाने आणि इडीने नोटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीच्या करोल बाग इथून पाचजणांकडून सव्वा तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

देशभरात ठिकठकाणी कोटींची रक्कम जप्त करण्याच आली. यात ठाणे पोलिसांनी 1 कोटी 40 हजारांची रोकड जप्त केली.जप्त केलेल्या सर्व नव्या चलनातल्या आहेत. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली. तर  पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी ६७ लाखांची रोकड जप्त केली. आणि दिल्लीत करोल बागमधून पाचजणांकडून सव्वा तीन कोटींची रोकड जप्त केली गेली. 

दिल्लीच्या हॉटेल तक्षमध्ये आयकर विभाग आणि गुन्हे विभागाने ही जप्तीची कारवाई केलीय. संशयित आरोपी हे मुंबईहून दिल्लीला जुन्या नोटा घेऊन जात आणि दिल्लीला नव्या नोटा बदलून पुन्हा मुंबईत आणायचे. तर बेंगऴूरुमध्ये आयकर विभागाने धाड घालून सव्वा दोन कोटींच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत.

पणजीमध्येही 68 लाखांच्या नवीन नोटा हस्तगत करण्यात आल्या. तर कळंगुट  पोलिसांनी 24 लाखांच्या नवीन नोटा ताब्यात घेतल्यात. चंदीगडमध्ये इडीने 2 कोटी अठरा लाखांची रोकड जप्त केली. 17 लाख 14 हजारांच्या नवीन नोटांसह 100 रुपयांच्या 52 लाखाच्या नोटाही जप्त करण्यात आल्यात.