नुडल्सची परवानगी नसली तरी 'पास्ता'ची लायसन्स आहे - बाबा रामदेव

अन्न सुरक्षा आणि देखरेख संस्था 'एफएसएसएआय'नं बाबा रामदेव यांची पतंजलि संस्था 'आटा नुडल्स' बाजारात उतरवण्यात खो घातलाय. 

Updated: Nov 18, 2015, 10:58 PM IST
नुडल्सची परवानगी नसली तरी 'पास्ता'ची लायसन्स आहे - बाबा रामदेव title=

नवी दिल्ली : अन्न सुरक्षा आणि देखरेख संस्था 'एफएसएसएआय'नं बाबा रामदेव यांची पतंजलि संस्था 'आटा नुडल्स' बाजारात उतरवण्यात खो घातलाय... यावर, बाबा रामदेव यांनी एक पत्रक काढून खुलासा केलाय. 

'एफएसएसएआय'चे प्रमुख आशिष बहुगुणा यांच्या म्हणण्यानुसार, आवश्यक ते लायसन्श मिळवल्याशिवाय बाबा रामदेवांनी आपल्या या पतंजलिच्या नव्या प्रोडक्टची घोषणा केलीय.  

पतंजलि नुडल्सला अजून बाजारात विक्रीची परवानगी मिळालेली नाही. इंस्टंट नुडल्स स्टँडर्डाइज्ड उत्पादन नाही. त्यामुळे, अशी प्रोडक्टस् परवानगिशिवाय बाजारात आणले जाऊ शकत नाहीत, असं बहुगुणा यांनी म्हटलंय. 

यावर, बाबा रामदेव यांनी आपल्याकडे, एफएसएसआयनं सेंट्रल कॅटेगिरीत पास्ताचं लेबलिंग लायसन्स असल्याचं म्हटलंय... आणि एफएसएसआयच्या व्याख्येनुसार, नुडल्स पास्ता कॅटेगिरीत येतात. याच आधारावर त्यांनी ज्यांच्याकडे नुडल्स बनवण्याचं लायसन्स आहे अशा वेगवेगळ्या कंपन्यांशी नुडल्स बनवण्याचा करार केलाय.

उल्लेखनीय म्हणजे, गेली पाच महिने बाजारातून गायब झालेल्या मॅगीनं पुन्हा एकदा बाजारात पदार्पण केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.