नवी दिल्ली : गेल्या 92 वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प यंदा मोडीत निघालीय. रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प एकत्र करून सादर करण्यात येणार आहे.
आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थसंकल्पाचाच भाग असेल. रेल्वेचा स्वंतत्र अर्थसंकल्प जरी सादर होणार नसला, तरी रेल्वेच्या आर्थिक स्वातंत्र्यावर कुठलीही गदा येणार नसल्याचं कॅबिनेट समोरच्या प्रस्तावात नमूद करण्यात आलंय.
अर्थसंकल्पाची तारीख बदलल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनही लवकर सुरू करावं लागणार आहे. त्यासाठी हिवाळी अधिवेशनही आधीच सुरू करावं लागणार आहे. यासंदर्भात तारखांचे निर्णय कॅबिनेटची संसदीय कार्य समिती घेईल.