'तडकाफडकी बदलीबाबत नाराज नाही'

हरयाणा सरकारचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांसोबतच्या शाब्दिक चकमकीनंतर तडकाफडकी बदली करणाऱ्यात आलेल्या महिला एसपी संगीता कालिया यांनी घटनेनंतर प्रथमच मीडियाशी संवाद साधलाय. 

Updated: Nov 30, 2015, 03:07 PM IST
'तडकाफडकी बदलीबाबत नाराज नाही' title=

चंदीगड : हरयाणा सरकारचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांसोबतच्या शाब्दिक चकमकीनंतर तडकाफडकी बदली करणाऱ्यात आलेल्या महिला एसपी संगीता कालिया यांनी घटनेनंतर प्रथमच मीडियाशी संवाद साधलाय. 

पोलीस विभागात येण्यासाठी आपण सहा नोकऱ्या सोडल्या, असे मीडियाशी बातचीत करताना त्यांनी सांगितले. यावेळी तडकाफडकी बदली केल्याबाबत त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची नाराजी दिसत नव्हती. याबाबत त्यांना विचारले असता, 'सरकारने हा निर्णय नक्कीच विचारपूर्वक घेतला असणार. कॅबिनेट मंत्री अनिल बिज यांच्याबाबत माझ्या मनात कोणतीही अढी नाही. ट्रान्सफर आणि पोस्टिंग हे तर या नोकरीचा एक भाग आहे,' असे संगीता म्हणाल्या. 

संगीता यांनी ९ फेब्रुवारीमध्ये फतेहबादमध्ये एसपी पदावर नियुक्त झाल्या. नियुक्ती झाल्यानंतर तातडीने त्यांनी कामास सुरवात केली. गेल्या दहा महिन्यांत त्यांच्या नेतृत्वाखालील फतेहबाद पोलिसांनी अनेक केसेस सोडवल्या.

त्यानंतर वर्षभराच्या आतच त्यांची बदली करण्यात आलीये. यावेळी फतेहबाद कसे वाटले असे विचारले असता, गुन्हेगार सोडून बाकी सर्व मला माझ्या कुटुंबासारखे आहेत असे त्यांनी हसतहसत उत्तर दिले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.