AXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI

 अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण आज रिझर्व बँके दिले आहे.  अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आणि बदली करण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. 

Updated: Dec 12, 2016, 07:44 PM IST
 AXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI title=

नवी दिल्ली :  अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण आज रिझर्व बँके दिले आहे.  अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आणि बदली करण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. 

त्यानंतर अशी शक्यता वर्तविण्यात आली की अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द होऊ शकते त्यावर रिझर्व बँकेला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. 

नोट बंदीनंतर  रोख रक्कमेच्या अदलाबदलीत ज्या अनियमितता झाल्यात त्यात सर्वाधिक अधिकारी हे अॅक्सिस बँकेचे होते. त्यामुळे अशी शक्यता वर्तविण्यात आली होती की त्यामुळे आरबीआय एक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करू शकते. पण अॅक्सिसवर अशी कोणतीही कारवाई होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

नोटबंदीनंतर अॅक्सिस बँकेत ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचे प्रकार झाले, त्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचे बोलले जाते. तसेच सोशल मीडियावर अॅक्सिस बँकेसंदर्भात जोक्स पसरत होते. एक्सिस बँकेला भारताची स्वीस बँक घोषीत करा. लोक काळा पैसा यात जमा करू शकतील.